Logo

शासन मान्यताप्राप्त

मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठान

(नोंदणी क्र. अहमदनगर/००००5३८/२०२५)
संचालित
राज्यस्तरीय मराठी प्राविण्य परीक्षा 2025-26

इयत्ता 1 ली ते 7 वी साठी

मराठी भाषा गौरव पुरस्कार

🏫

शाळेसाठी विशेष पुरस्कार

एका शाळेचे १५० पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाल्यास त्या शाळेला राजभाषा मराठी गौरव पुरस्काराने गौरविण्यात येईल व विशेष मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

👨‍🏫

मुख्याध्यापकांसाठी विशेष पुरस्कार

ज्या शाळेचे सर्वात जास्त विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादी व जिल्हा गुणवत्ता यादी यामध्ये प्राविण्य मिळवतील, अश्या शाळेच्या मुख्याध्यापकांस "मराठी चाणक्य मुख्याध्यापक" या विशेष पुरस्काराने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल.

📚

मराठी अध्यापकांसाठी विशेष पुरस्कार

ज्या शाळेचे सर्वात जास्त विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादी व जिल्हा गुणवत्ता यादी तसेच केंद्रीय गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थी आल्यास सदर अध्यापकास मराठी विद्याभूषण पुरस्काराने, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विशेष मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल.

परीक्षेचे नियोजन

📅
  • प्रवेशपत्र भरण्याची अंतिम दिनांक: ३० ऑगस्ट २०२५
  • परीक्षा पार पडण्याची दिनांक: २८ डिसेंबर २०२५
  • परीक्षा निकाल जाहीर करण्याची दिनांक: ३० जानेवारी २०२६

पारितोषिक वितरण समारंभ नियोजन कळविले जाईल.

📄

माहिती पत्रक

✍️
Mother teaching child

‘‘ माझी मराठीची बोलू कौतुके ।
परि अमृतातेहि पैजासी जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।
- संत ज्ञानेश्वर

Boy with trophy
मराठी बोलू,
मराठी लिहू,
मराठी वाचू ,
मराठी वाढवू धैर्याने !
स्पर्धा परीक्षेत मराठी
जनांचा टक्का वाढवू,
झेंडा फडकवू,
स्वाभिमानाने !
मराठीचे संवर्धन करू,
मराठीचा प्रचार करू,
मराठी जपू अभिमानाने !
👋

प्रस्तावना

प्रिय,
विद्यार्थी आणि पालकांना सप्रेम नमस्कार!

मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठान च्या वतीने मराठी भाषेचा गौरव, प्रचार - प्रसार करण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवत आहे. त्यातीलच एक महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे राज्यस्तरीय 'मराठी प्राविण्य परीक्षा' होय. ही परीक्षा आपल्या राज्यातील प्रत्येक मराठी भाषिक पाल्यांना, मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण करून देण्यासाठी तसेच भविष्यातील स्पर्धा-परीक्षांमध्ये मराठी विषयासंदर्भात पायाभूत तयारी करून घेण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली आहे.

सध्याच्या युगामध्ये मराठी भाषेवर, इतर भाषांचे आक्रमण पाहता, मराठी भाषेची गळचेपी होत आहे. महत्वाचे म्हणजे पालकाला आपला पाल्य इतर भाषेतून ज्ञान मिळवून यशस्वी व्हावा, असे वाटत आहे; परंतु, महाराष्ट्राची मराठी ही मायबोली भाषा असल्याने इतर भाषेतील आशय, विषय, संबोध पूर्णतः समजणे विद्यार्थ्याला अवघड जाते, आणि म्हणावे तसे आकलन होत नाही, म्हणून भाषिक तज्ज्ञांच्या हि गोष्ट लक्षात आली.

मातृभाषेशिवाय इतर कोणत्याच भाषेत, विद्यार्थी चांगल्याप्रकारे ज्ञान मिळवू शकत नाही. म्हणून सरकारने देखील मातृभाषेतूनच सर्व क्षेत्रातील शिक्षण यापुढे उपलब्ध करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आपल्या अगोदर सर्व राज्य आपापल्या राज्यातील मातृभाषेप्रमाणे शिक्षण उपलब्ध करून देत आहेत. इतर देश विदेशात देखील शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना तेथील मातृभाषा सर्वप्रथम आत्मसात करावी लागते आणि मगच, आपले शिक्षण पूर्ण करता येते.


यावरून, आपण लक्षात घेतले पाहिजे की, आपण आपली मातृभाषा कशाप्रकारे संवर्धित केली पाहिजे? मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने मराठी विषयामध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषिक पाल्यांना / विद्यार्थ्याला आपली मायबोली भाषा सर्व केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य सेवा आयोग / इतर शासकीय, निम-शासकीय स्पर्धा परीक्षेत यापुढे पायाभूत तयारीने अभ्यासता यावी आणि तिच्या सखोल ज्ञानाची तयारी प्राथमिक स्तरापासूनच विध्यार्थांमध्ये रुजली जावी, याकरिता सदर परीक्षेचे कौशल्यपूर्वक आयोजन केले आहे, यामुळे मराठी भाषेविषयी सर्व मराठी भाषिकांत जाणीव जागृती निर्माण होऊन, मराठी अस्मिता जागरूक राहण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मदत होईल ही अपेक्षा !


'धन्यवाद'
आपला कृपाभिलाषी
संचालक - मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठान

📚

परीक्षेचा अभ्यासक्रम

राज्यस्तरीय मराठी प्राविण्य परीक्षा ही विद्यार्थ्यांमधील मराठी विषयाचे प्राविण्य ओळखण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी घेतली जात असल्याने सदर परीक्षेसाठी ठेवलेला अभ्यासक्रम हा इ. १ ली ते ७ वी च्या त्या त्या वर्गातील विध्यार्थ्यांच्या मराठी विषयाच्या क्रमिक वार्षिक पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित ठेवलेला आहे / निश्चित केलेला आहे. त्यामध्ये इ. १ ली चा अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम आराखडा (केंद्रीय शिक्षण मंडळ) यांच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, तर इ. २ री ते ७ वी पर्यंतचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.


सदर अभ्यासक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल :
इयत्ता १ली
इयत्ता २री
इयत्ता ३री
इयत्ता ४थी
इयत्ता ५वी
इयत्ता ६वी
इयत्ता ७वी

इयत्ता १ली अभ्यासक्रम

आकलन (४० गुण)

  • उताऱ्यावर आधारित प्रश्न
  • कवितावर आधारित प्रश्न
  • सुसंगत वाक्याचा परिच्छेद
  • चित्रवर्णन

कार्यात्मक व्याकरण (३० गुण)

  • विरामचिन्हे
  • जोडाक्षरे
  • मुळाक्षरे
  • चौदाखडी

शब्द संपत्ती (२० गुण)

  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे

भाषा विषयक ज्ञान (१० गुण)

  • चांगल्या सवयी
  • चव
  • दिनविशेष
  • खेळ / सण
  • माझी ओळख

टिप : इयत्ता पहिलीच्या नवीन क्रमिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतील.

प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम उपलब्ध!

⏱️

परीक्षेचे स्वरूप आणि वेळापत्रक

वर्ग प्रश्न वेळ गुण
इ. १ ली व २ री ५० १.३० तास १००
इ. ३ री व ४ थी १०० २.०० तास २००
इ. ५ वी ते ७ वी १५० २.०० तास ३००
परीक्षा प्रवेश शुल्क: २५० रु
🏆

बक्षिसे व नियम

🥇

राज्यस्तरीय बक्षिसे

  • प्रथम क्रमांक - ₹७०००
  • द्वितीय क्रमांक - ₹६०००
  • तृतीय क्रमांक - ₹५०००
  • चतुर्थ क्रमांक - ₹४०००
  • पाचवा क्रमांक - ₹३०००
🥈

जिल्हास्तरीय बक्षिसे

  • प्रथम क्रमांक - स्मृतिचिन्ह + प्रमाणपत्र
  • द्वितीय क्रमांक - स्मृतिचिन्ह + प्रमाणपत्र
  • तृतीय क्रमांक - स्मृतिचिन्ह + प्रमाणपत्र
  • चतुर्थ क्रमांक - स्मृतिचिन्ह + प्रमाणपत्र
  • पाचवा क्रमांक - स्मृतिचिन्ह + प्रमाणपत्र

बक्षीस रक्कमेसोबत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल.

बक्षिसांबाबत नियमावली

🏆
राज्यस्तरीय बक्षिसे

प्रत्येक इयत्तेच्या बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर राज्यस्तरीय बक्षीस रक्कम विभागून दिली जाईल. यासोबत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल.

रक्कम: ₹७००० ते ₹३०००
🌟
जिल्हास्तरीय बक्षिसे

जिल्हास्तरीय निवडयादी जिल्ह्यात पाचव्या क्रमांकापर्यंत घोषित करून सदर विद्यार्थ्याला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.

प्रतिष्ठापूर्ण सन्मान
💎
केंद्रस्तरीय बक्षिसे

केंद्रस्तरीय विद्यार्थी निवडयादी पाचव्या क्रमांकापर्यंत घोषित करून सदर विद्यार्थ्याला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.

राष्ट्रीय स्तरावर ओळख